Thursday, February 16, 2012

आजकाल..


           आजकाल..मनात नुसता घोळ चालु आहे....अनेकानेक विषय डोक्यांत एकाच वेळी थैमान घालतायत सगळं काही.....नुसते अनामिक....कश्याचाही कश्याशी काडीमात्र संबंध नाही...सगळा गुंता....वर्तमान...भविष्य...अन नकोनकोसा भुतकाळ...सारंकाही एकमेकांत मिसळुन बहुदा नविनच रसायन तयार झालयं आणी ते रक्तात मिसळतयं बहुतेक....त्याची नशा अशी काही चढलीय की आजकाल दिवस कधी उगवतो...अन कधी सरतो....तेच लक्षात राहात नाही....
             रोज सकळी उठणे....आवरुन दिवस सुरु होतो...अन हाहा म्हणता मावळतो ही........ कधीकधी वाटतं...दिवस फारचं लहान झालाय किंवा मी जरा फास्ट झालोय....शाळेत असताना..ती नऊ तासांची शाळा म्हणजे कोंडवाडा वाटायची...कधी एकदा शेवटचा तास संपतो अन मी बँग घेऊन पळतो असे व्हायचे..अन आता.........?
फार जास्त काही अपेक्षा नाही माझी आयुष्याकडुन...बस...काही प्रश्न अधोरेखीत झालेले...किंबहुना..मीच केलेले...बस त्यांची उत्तरे.....              काही प्रश्न वर्तमानाच्या निगडीत जसे...की माझा स्वभाव...आहेच तो मुळी रोखठोक..जे आहे ते समोर बोलायचे..तेही तोंडावर...समोर एक आणी मागुन एक हा माझा स्वभाव नाही...त्यामुळे कित्तेकदा माणसे मला तापट किंवा स्वार्थी बोलतात...जे की मी नाही......बस जे चुकीचे आहे...ते आहेच...आहेत काही गोष्ठी ज्यांबाबत जराशीही तडजोड करायला मी मान्य करत नाही..अन का कराव्या?   त्यामुळे कित्तेकदा...माझ्याबद्दल गैरसमज सहजच करुन घेतला जातो....बट...चलता है बॉस...अभी इथिक्स संभाले तो किसी ना किसी को तो हर्ट होना ही है...और अगर इथिक्स नही संभाले तो....खुदको फेस करना भी नामुम्कीन हो जाएगा..बेटर टु लिव दँट टॉपीक...
              रोजच्या दिवसागणिक..घरातल्या व्यक्ती...अनेकानेक स्वप्न बघत राहातायत..अन मनाला दाखवत राहातायत..त्यातली काही स्वप्ने खरेच देखणी असतात...पण कित्तेकदा..ती पुर्णत्वाला जातील असे वाटत असतानाच कुठेतरी माशी शिंकते...अन उरते..ती फक्त आठवण...अन बेरंगी राख....त्यांची....
भुतकाळ....भुतकाळाचे भुत काही केल्या मानेवरुन उतरत नाही असे बोलतात...कदाचित ते थोड्याफार अंशी खरे ठरतेय....काही गोष्ठी..ज्या फार मागे सारुन पुढे जाण्याचा प्रयत्न आपण करत असतो...त्याच थोड्यावेळाने दत्त म्हणुन समोर उभ्या ठाकतात..तेंव्हा त्यांच्यावर पर्याय काही नसतो...आपल्याकडे काहीच ऑप्शन नसते...आणी असले तरी मला तरी त्यातले एकही वापरायचे नाही...कारण त्या सा-याला आता भरपुर उशीर झालाय..अन त्याला अर्थही नाही...
               बरेचदा मी बोलण्याच्या ओघात तेंव्हा काही काही बोलुन जायचो...आज तेच सारे खरे ठरतेय..तेंव्हा ह्या शब्दांचीच भिती वाटायला लागलीय...का ठाऊक नाही...पण मनात वाटत असते..उगाच काहीतरी बोलुन जायचो..अन तेच खरे व्हायचे...शब्द दुधारी तलवार असतात ना शेवटी....
                      सारं काही वाईटच सुरु आहे असेही अजीबात नाही...बरेच काही नविन शिकायले मिळतेय...स्वतःच्या अंतरंगाचे नवनविन पैलु अनुभवायला मिळत आहेत...जबाबदारी...ह्या शब्दाचा अगदी डिटेल्ड अर्थ सध्या अनुभवतोय...सारे काही मँनेज करायचेय...मी...माझा वर्तमान...माझे भविष्य..अन माझा भुतकाळ...अगदी इत्यंभुत...काहीही ड्रॉ-बँक्स मागे ठेवायचे नाहीत..आता आयुष्यम्हणजे सापशिडीचा खेळ..कधी शिडी सापडते एखादी अन आयुष्य एकदम शंभरच्या आकड्यावर पोहोचते..अन कधी नव्याण्णववरचा साप क्षणांत दोन वर आणुन सोडतो...पण तरीही थांबायचे नाही...धावतच राहायचे...त्याच शंभरच्या दिशेने...
                    एखादा हात नक्कीच पाठीवर पडेल जो सोबत देईल आयुष्यभराची..अन म्हणेल..डोन्टवरी..आय विल बी ऑलवेज विथ यु...याच खुळ्या आशेवर

बस......

ओंकार

Monday, January 9, 2012

कालयं तस्मे नमः


                बरेच दिवस स्वतःशी व्यक्त व्हायला संधीच मिळाली नाही..आज वेळ काढुन बसलो....ह्या दरम्यानच्या काळात बरेच काही घडुन गेलं...बरेच काही...अनेक नविन मित्र मैत्रीणींशी ओळख झाली...जुन्या मित्रांसोबत गोव्याची सफर...आहाहा...अगदी अफलातुन अनुभव..बस..मी आणी माझी तनहाई वाला फिल देणारा तो तारकर्लीच्या डॉल्फीनसफारीचा अनुभव...अफलातुन...आजुबाजुला नजरेच्या टप्यातही न मावणारा तो निळा समुद्र अन मी....बस...अजुन कश्याचीही अपेक्षा नव्हती....अगदी सुरेख...बाप्पाच्या आशिर्वादाने अनेक प्रश्नांची उकल झाली..असे प्रश्न जे 2010 साली माझ्या डोक्यांत वादळासारखे घोंघावत होते..त्यातले अनेक प्रश्न उलगडले....

               मुख्यत्वे अश्या काही व्यक्ती जवळ आल्या ज्या आयुष्याला वेगळाच अर्थ देऊन गेला..अनेक मोठ्या मोठ्या  व्यक्तींशी ओळख झाली..अन त्यांच्याकडुन कवितांवरही दाद मिळाली...उदाहरणास्तव सांगायचे तर चंद्रशेखर गोखले...ह्यांची माझ्या एका चारोळीला आलेली दाद हा तर अविस्मरणीय प्रसंग..एखाद्या गल्ली क्रिकेट खेळणा-या पोराला सचिन तेंडुलकरने पाठीवर थाप मारुन मस्त शॉट बोलावे असा तो फिल...अगदी साबीर काका..म्हणजे उर्दु गझलेचे बेताज सम्राट...त्यांच्याशी परिचय झाला..त्यांच्याकडुनही मार्गदर्शन मिळाले....निशब्द देव ने गझल नावाची नशा डोक्यात भिनवली...एकुण काय तर गेले वर्ष अगदी अप्रतिम..
              त्याचसोबत काही व्यक्तींचे खरं रुप देखील अगदी जवळुन पाहायला मिळाले की काही व्यक्ती कश्या स्वतःचा विचार करतात फक्त...समोरचा व्यक्ती..आपल्याविषयी काय विचार करेल ह्याची किंचितही चिंता त्यांना नसते...तिच ती अन तोच मी...अन सरलेला फक्त दोन वर्षांचा काळ....अन त्या दोन वर्षांनतरही त्या व्यक्तीत न घडलेला फरक...इतके सारं घडुन गेलं...तरीही पुन्हा तेच पालुपद आता खरचं सांगावं तर किव यायला लागलीय...असोत व्यक्ती तेवढ्या प्रव्रुत्ती...काय बोलावं....
              आता कोणीतरी विचारलं की नविन वर्षात आता काय करणार...माझे उत्तर एकचं..की मस्त जगुन घ्यायचयं.... आता स्वतःसाठी...अन तिच्यासाठी....बाकी काही नको....

असेच पाठीशी राहा मित्रांनो..तुमच्या प्रार्थनांची अन आशिर्वादांची खुप गरज आहे....

ओंकार तोरसकर