Saturday, February 20, 2010

No More Justifications

ती अशीच होती गोड गुलाबी.... लाजरी बुजरी... काहीही बोललो तरी रुसायची..... अन नाही बोललो तर रागवायची सगळं लटकं लटकं.....भांडायची, पण प्रेम पण करायची....... माझी ती "वेडी" अनेकदा माझ्यासाठी झुरायची..... हे सारेच भास होते... वाटलं होतं की तु खरोखरच माझ्यावर प्रेम करायचीस ... पण नाही तेही फक्त एक स्वप्नच ठरले....फडफडते “दिवास्वप्न“,
असे का अचानक घडले ते मला अजुनही कळले नाहीय.... असे काय बिनसले की तु माझ्यापासुन इतकी दुर निघुन गेली स.......दुर तर निघुन गेलीच पण जाताना ते सगळे आरोप का ? काय वाईट वागलो होतो मी आजवर तुझ्याशी? ज्याबददल हा सारा खेळ मांडावा लागला.... बाकी सारं……..
आजही मान्य करीतो की तु अल्लड पणे सगळे निरर्थक बिनबुडाचे आरोप केलेस.... अग गेलीच होतीस... मी रोखत तरी कुठे होतो. मला हवा होता तो तुझा आनंद. माझ्यासाठी आजही काहीच नको होते , बरं जे काही वागलीस त्याने तुझीच प्रतीमा खराब करुन घेतलीस.... तुझ्या आजु-बाजुच्यांनी तुला समजावण्याचा लाख प्रयत्न करुन पाहीला, पण शेवटी.... त्यांनीही हात टेकले तुझ्यासमोर... असुदेत.. जे काही झाले त्याला मी कुठेच जबाबदार नव्हतो.... जे काही केलेस ते तुच..... तु जे काही वागलीस, बोललीस त्याने माझ्या आयुष्यात विशेष काहीच फरक नाही पडला ..... फरक पडला तो फक्त एकच की आजवर तुझ्याशिवाय जगणं माझ्यासाठी अशक्य होतं पण आता तुझ्याशिवाय... जगायला शिकलोय.......आणी जगतोय….. कदाचीत जरा जास्तच आनंद उपभोगतोय... कारण माहीतीय? कारण आजवर केवळ तुझ्यासाठीच जगत होतो.....पण आता जगतोय स्वतःसाठी.... आणी खात्री आहे की नक्कीच जगेन. तुला माहीतीय ना की आजवर केवळ तुलाच समजुन घेत आलो .... इतके की आपल्यातले नातं विसरुन एखादया लहान मुलीसारखे तुला जपले.... तळहातावरच्या फोडाप्रमाणेच तुला सांभाळले.... ह्याला पुरावा देण्याची मला काहीच गरज नाही .
पण आता खरे सांगु तु माझ्या आयुष्यातुन दुर गेलीस ह्याचा अजीबात त्रास होत नाहीय मला. देवाने तुला माझ्यापासुन दुर का नेले? असा प्रश्न मला आजकाल चुकुनही पडत नाही. कारण तुझ्याहुन जास्त काळजी घेणारे असे जिवाला जिव लावणारे मित्र पहीलेच माझ्या भोवती त्याने आणुन ठेवले. मान्य आहे की तुझ्या अश्या जाण्याने माझ्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली ती भरुन काढणे माझ्यासाठी अशक्य होते, पण बाप्पाने सोने माझ्याकडुन नेले पण जाताना परीसासारखे मित्र मैत्रीणी देवुन गेलाय तो त्याचे उपकार कसे फेडु? जे मला ओळखतात... माझ्यातल्या त्या वेड्या मुलाला समजुन घेतात बस... अजुन काहीच नकोय मला
तो बाप्पा ज्याच्या साक्षीने आपले नातं इतकं फुलले... बहरले.... तो सर्व काही जाणतो त्याला काही सांगण्याची गरज नाही......
आणी हो जर खरेच मी इतका वाईट आहे मग बोलत का नाहीस …………
“ I HATE U”
आहे हिम्मत..... ह्यातच सगळे आले....
That’s It………….. No More JUSTIFICATION NEEDED………
Thanks For being Apart from My life and for TEACHING To LEAVE FOR MYSELF…….
MAY GOD BLESS U………..

7 comments:

  1. Keep on writing ..write on various issues may God Bless U too my ndear friend ... suruvaat chhan zaleli ahe keep it up All the best

    Sunil Kaka

    ReplyDelete
  2. tu tujhyasathi jagayla shikawas hich ichcha hoti
    tula te jamley
    khoop changli gosht ahe
    thanks
    may god bless u always
    tula haw te tyane tula dyaw
    sukhi raha

    ... tujhi well wisher

    ReplyDelete
  3. khup sunder lihil ahes omkar........
    vachata vachata dole agadi bharun ale.

    ReplyDelete
  4. Kya bolnar speech less!!!!!!!!!!!!!!!1

    pan salute to u r attitude and sprit!!!!!!!!!!

    yessssssssssss be cheer up!!!!!!!!!!!11

    ReplyDelete
  5. Thode ushiraach aalo kathaanchya blogvar!Tumchya kavitaach jagat hoto naa,tyaatach guntun aahe ajunhi.Kavitaa aani kathaa anolkhi ajibaat vaatat naahit,mi je jagatoy aani je maazyaasaarkhyaannaa shabdaant bolane shakya naahi naa,akShARshAhA tech tumhi shakya karataa,kharach ! Suggestion denya itakaa mothaa kadhich naahi honaar mi,pan fakt evhadhach saangaayache aahe,ki tumhi lihaa,tyaatun maazyaa bhaavanaanna vaat mokali hote,naahitar,gudamarun jaain bhaawanaanchya ozyaane,baaki nehami comments n karataach anubhavatoy,pan tumhaalaa maahit asaav mhanun aataa-aataa abhipray detoy(khare tar magne maagtoy).Sorry fr huge comment,waiting always...(Amol Chitte)

    ReplyDelete
  6. zakaaass lihila aahe re.. I was left spell bound.. toooooo good!!

    ReplyDelete