Saturday, July 3, 2010

पुन्हा एकदाच सांगायचेय तुला

तिला वाटले की तिच्याशिवाय तो जगुच शकत नाही.... नाही यार ते साफ चुकीचे होते....त्या तिच्या आठवणींच्या ओझ्याखाली त्याचे जगणे तसेच अवघडच होते पण असोत..... ति....तिच्या आठवणी ह्या मनातुन साफ पुसुन टाकणे त्याच्यासाठीतरी अशक्य होते.पण तरीही तो आज लढत होता.. त्याच्या विरुध्द स्वतःच्या मनाविरुध्द सुरवातीचे काही दिवस त्याचे मन गुदमरुन गेले होतं... जगण्याची जिद्दच तो हरवुन बसला होता.... आता जगायचे तरी कोणासाठी आणी का? एकटा असताना तो नेहमीच विचार करायचा की असेच एखाद्या अंधा-या रात्री माझ्या आयुष्याच्या दिव्याची फरफरती वात कोणीतरी चिमटीत पकडुन विझवुन टाकावी.... व ह्या जगाचा असाच गुपचुप निरोप घ्यावा....
कारण.... फक्त एकच "ती" हो तीच.... तो तीला श्रावणी बोलायचा "श्रावणी" हे नाव देण्यामागचे कारण म्हणजे तिचे मनमुराद हास्य अगदी श्रावणसरीसारखेच.... अगदी निरागस अगदी गोंडस...पण नंतर समोर यायला लागला तिचा बुरख्याआडचा चेहरा जो त्या श्रावणी संकल्पनेच्या पार विरुध्दच होता.. तितकाच भेसुर.. आक्राळविक्राळ....इतके दिवस तिने मुद्दाम तो चेहरा आपल्या निरागस चेह-याच्या आड दडवला होता....तो चेहरा ति तशीच सर्वांपासुन लपवत होती पण त्याला मात्र दिसत होती... त्याची सदा हस-या चेह-याची श्रावणी... तिच्या त्या हसण्यामागचे कारस्थान मात्र तो दिसत असुनही न पाहील्यासारखेच करत होता... कारण त्याने तिच्यावर मनापासुन केलेले प्रेम...शरीरावर नाही तर आत्म्यावर... मनावर...तिच्यातल्या त्या गोंडसपरी वर केलेले प्रेम...
त्याला अनेकांनी रोखण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला पण सगळेच व्यर्थ…कदाचीत हे नातंच देवाला मान्य नव्हते असेल तरी कसे? त्याचा पायाच खोट्याच्या आधाराने बांधला गेला होता आणी त्या आधारावर ते नातं कधीच उभे राहू शकले नसते....आणी जरी राहीलेच असते तरी ते तात्कालीक आयुष्यभर साथ मिळेल ह्याचा भरोसा कोणीही देऊ शकले नसते..... कालच कुठेतरी वाचनात आले की जेंव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलासाठी रडते, तेंव्हा त्याचा अर्थ होतो की ती त्या मुलावर खुप प्रेम करते पण जेंव्हा एखादा मुलगा त्या मुलीसाठी रडतो तेंव्हा त्याचा अर्थ होतो की त्या मुलीवर त्या मुलापेक्षा जास्त प्रेम कोणीही करु शकत नाही.... तो तिच्यासाठी वारंवार रडत होता तीला समजावत होता,,, पण....
त्याचा काहीच उपयोग होत नव्हता ... किंबहुना त्याच्या डोळ्यातल्या अश्रुंची आज तीला किंमतच उरली नव्हती. त्याच्या ध्यानीमनी नसताना ती त्याला म्हणाली की माझ्या आईवडीलांनी माझे लग्न ठरवले आहे ....त्याच्यावर तर आभाळच कोसळले होते.... काहीच कळत नव्हते...काय करावे कसे रोखावे तिला....काहीच नाही पण आज ती काहीही ऐकण्याच्या मनस्थीतीतच नव्हती,,,, खरेच झोपलेल्या व्यक्तीला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेणा-या व्यक्तीचा झोपमोड होणे अशक्य... तीचेही अगदी तसेच होते...तीला आज समजुन घ्यायचे नव्हते.... नंतर ती जे काही वागली त्याचा कोणालाच अंदाज बांधता आला नाही.... म्हणतात न की एक खोटे लपवण्यासाठी... अनेक खोटी बोलावी लागतात..... तो तीला म्हणालाही होता.. की चल आपण पळुन जाऊ...तेंव्हा ती म्हणाली होती..की मला पळुन जाऊन लग्न नाही करायचे...
त्याने तीचा नादही सोडला व त्याने आता त्याचे ध्येय ठरवले की इतके मोठे व्हायचे की जगातली कुठलीही मुलगी त्याला नकार देऊच शकणार नाही. तो पुन्हा रमु लागला तीच्या आठवणी मनात दाबुन टाकल्या त्याने ... पण ती.... तीने सुरु केले नवीनच नाटक रोज नवे आरोप रोज नवे आरोप...ठाऊक होते.. तीला की त्याला वाद नाही आवडत...पण तीचे नेहमीच हे सुरुच होते...त्याने त्याच्यावर लक्ष नाही दयायचे असे ठरवुन तो... धावत होता..आपल्या ध्येयाकडे.....
तीचे तिथे चाललेल्या प्रत्येक गोष्ठी त्याला समजतच होत्या.... ती जे काही वागत होती... त्याचा परीणाम ह्या त्याचावर होत होता..पण तरीही तो टाळत होता... तीला. तीच्या त्या वागण्याला .... तीच्या ह्या वागण्याला कंटाळुन तीच्या आजुबाजुच्या सगळ्या व्यक्ती तीला सोडुन निघुन गेल्या होत्या.. त्या सगळ्यांनी तीची चुक दाखवुन देण्याचा अनेकदा प्रयत्न करुन पाहीला पण सारे व्यर्थ होते... ती कोणाचेच ऐकत नव्हती... आणी ऐकायचेही नव्ह्ते तिला दिसत होते. ते बस. ती आणी तो.... ज्याच्या साठी ती त्या वेड्या मुलाला पण सोडुन आली होती....काय कारण होते त्यामागचे पैसा.... जात.... की अजुन काही..... देवच जाणे..... त्या वेड्या मुलाला सोडायला काहीच कारण नव्हते...
तीला त्रास होईल असे काहीच वागत नव्हता तो...मग तरीही तीने त्याला का सोडले? ती आणी तो... दोघेही वेगळ्याच वाटेने आणी... ती दिंडोरा पिटत फिरत होती. की माझ्या आई वडीलांनी आमचे लग्न ठरवले आहे आणी काही दिवसांनी जी गोष्ठ कानावर पडली ती ऐकुन त्या मुलाचा स्वतःच्या कानावरच विश्वास नाही बसला..... " की तीने पळुन जाऊन लग्न केलं".....
त्याच्या सहज मनात आले की पळुन जाऊनच लग्न करायचे होते...मग..इतके खोटे बोलायची काय गरज होती... का दाखवलीस माझ्या वेड्या मनाला सप्तरंगी स्वप्ने... का घेतल्यास खोट्या शपथा.... का? देशील उत्तर? देऊच शकत नाहीस...कारण तु मला फसवलेयस..... आणी खरे सांगु का..... आता इथे भेटलीयस... पुन्हा आयुष्यात भेटु नकोस.....पुन्हा एकदाच सांगायचेय तुला की माझ्यासारखे पुन्हा कोणालाच फसवु नकोस....

बस.... अजुन तो मुलगा मला काही सांगुच शकला नाही.... डोळ्यातले अश्रु गोठवुन तो आताही माझ्यासमोर उभा आहे. अगदी शांत काहीही न बोलता... पण तरीही बरेच काही बोलणारा.......

ओंकार

4 comments:

  1. good
    tujhya bhawananna wat chan futatey shabdandware
    tujhya lekhanch pustak kar
    ..
    n by the way
    amch lagn paloon jaun nahi tar sarwanchya sakshine jhal ahe
    ...

    ReplyDelete
  2. तुझ्या कविता वाचून अस्पष्टपणे लक्षात येत होते सारे ..... लेख वाचून सगळा उलगडा झाला त्या कवितांचा आणि तुझ्या मनाचा हि .... प्रेम बीम या जगात काही नसतं रे ..... जो तो आपला स्वार्थ बघत असतो बस ... मनातल्या भावनांना चांगली वाट मोकळी करून दिलीस आहेस .... keep it up.

    ReplyDelete
  3. khali link dili ahe na ti katha vach ... tula nakki avadel :)

    http://santoshimarathiworld.blogspot.com/2008/11/blog-post.html

    ReplyDelete
  4. Koni kaahihi mhano,malaa parvaa naahi,ki tyamule mi maaze tayaar zaalele mat badalnaar naahi.Mi tumchaa PahILYaapAAsuncha tumchaa follower aahe,fakt comments aatapaasun karayalaa laagaloy.Tumhaalaa jaanivhi nasel ki nakalat maazich kathaa ubhi raahili aahe tumchya-dwaare(fakt muliche lagn naahi zaale ajun)! Bhhawanaa pohochalya,keep it up mhananyaaitkamotha naahich mi.please Ignore comments(tumhalaa savay zaalich asel ashaanchi,tarihi),I'm waiting for next..(Amol Chitte)

    ReplyDelete