"मंद वाहणारा वारा अजुनही तुझ्या केसात गुंतुन अडखळत होता, का जाणे माझेही मन गुंतलेय अजुन तुझ्या वेड्या आठवणींमद्ये"
अथर्वच्या डायरीवर लिहीलेल्या ह्या ओळींचा खरा अर्थ आज मला उमगत होता.तो बराच वेळ स्वतःला समजवत होता. पण आज त्याचे मन् कशातही लागत नव्हते… कशातही. तो काही केल्या “वेदा”ला विसरु शकत नव्हता. तशी ती होती ही कधीही न विसरता येईल अशीच, “वेदा” खरोखर ही इतकी गोड होती निरागस होती. कधी कधी वाटायचे की देवाने हीला बनवताना निरागसता थोड्या ढिल्या हाताने हिच्यात टाकली, इतकी गोड की साखरेलाही हेवा वाटावा. ओठांनी कधीच काही न बोलता डोळ्यांनी बरेच काही बोलणारी…. हस-या चेह-याची…
जगासाठी हे दोघे एक “बेस्टेस्ट फ़्रेंड्स” होते अन ते कायम तसेच राहीले पण त्यांच्या मनातल्या एकमेकांच्या बद्दलच्या भावना त्यांचे खरे नातं हे फक्त त्यांनाच ठाउक होत त्याची जगाला कधीच पुसटशी कल्पनाही आली नाही किंबहुना त्यांनी जाणवुच नाही दिले तिचं आणी अथर्वचे वागणे हे कायम "बेस्ट फ़्रेंड्स'' ह्या संकल्पनेला धरुनच होते. खरे म्हणजे ते दोघे आमच्या ग्रुपची जान होते....
माझं नाव "श्रेयश" पण माझे सगळे फ्रेंड्स मला "श्री" बोलतात. मी, “रिग्वेदा”,”अथर्व” आणी आमच्या सर्वांचीच लाडकी "प्रिया"(तिचे खरे नाव "सुप्रिया") पण तिच्या ख-या नावाने आम्ही कधी हाक मारली असे मला आठवत नाही. आम्ही चौघे चौकोनाचे चार कोन होतो तरीही आमच्या मधली मैत्री अन आमच्या मधले बॉंडींग इतकं पक्क होते की जगातली कुठलीही शक्ती आम्हाला वेगळे करु शकणार नव्हती.तसे मी आणी "वेदा" एकदम चाईल्डहुड फ्रेंड्स.. एकत्र खेळतच मोठे झालो एकाच शाळेत शिकलो अ टिपिकल “चाईल्डहुड फ्रेंड्स”. “वेदा” दिसायला अगदी चार-चौघात छान उठुन दिसणारी काळेभोर डोळे, गालावर सतत येणारी एक छोटीशी बट, चेह-यावर नेहमीच असणारे एक मंद स्मित, कधी कोणाला उलट उत्तर नाही कधीच कोणाशी भांडण नाही. आई वडीलांवर जिवापाड प्रेम करणारी “देवभोळी” मुलगी अगदी एखादी गोंडस बाहुली शोभावी अशीच होती आमची "वेदा" सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी.
खरे म्हणजे मला पण ती आवडायची तिही अगदी शाळेत असल्यापासुन, माझ्या जीवनसाथीत मला जे काही गुण हवे होते ते सगळे गुण “वेदा”त होते आणी तिचे माझ्या बरोबर बोलणे, वागणे हे सगळे छान होते तिने माझ्या कवीतांची वही अगदी माझ्या नकळत माझ्या बँग मधुन बाहेर काढावी त्यावर मनापासुन दाद द्यावी एखादी कवीता वाचुन मनसोक्त हसावे कधी नकळत दोन टिपे गाळावीत अगदी खर सांगतो त्यातल्या अर्ध्याहुन अधीक कवीता तर मी तिच्या वरच लिहीलेल्या होत्या ते अजुनही तीला माहीत नाहीय तिला समजेल तरी कसे मी तीला कधी काही बोललोच नव्हतो माझ्या मनातल्या तीच्याबद्दलच्या भावना मी ओठांच्याआडच ठेवल्या होत्या.कारण तीची नी माझी असलेली मैत्री ह्या मैत्री खातर मी कधी माझ्या फिलिंग्स बोलुन दाखवल्याच नाहीत. कारण मला तीला गमवायचे नव्हते. एक मैत्रीण म्हणुन मला तीला त्रास झालेला अजीबात चालायचा नाही अशी होती आमची "वेदा".
अन प्रिया म्हणजे एक जिवंत ज्वालामुखी होती आमच्यात सगळ्यात लहान असल्याने खुप लाडकी सगळ्यांची. खुप बडबडी जरा जास्तच जगातल्या कुठल्याही गोष्ठीवर हिची वाद घालायची टयारी नॉर्मली खुप शांत वाटायची पण एकदा डोक हललं की काही खर नाही अगदी मारकुट्या बैलासारखी शिंग तासुन तयार अंगावर आलेल्याला शिंगावर घेऊन नाचायला.
आता अथर्व म्हणजे आमच जिनेयस होता शाळेपासुनच स्कॉलर दिसायला अगदी राजकुमार नसला तरी बाकी पेर्सेनलिटी एकदम झक्कास.आणी मी म्हणजे अगदी कुठल्याही गर्दीत सहज हरवलेला इतका कॉमन बस एकच गोष्ठ होती जी मला सगळ्यंपेक्षा थोड वेगळ करायची ती म्हणजे माझ्या कवीता बस इतर काही नाही अभ्यासात अगदी स्कॉलर नसलो तरी अगदी नापास होण्याची वेळ मात्र आली नव्हती.
आमचे चौघांचे एक वेगळे विश्व होते आमची मैत्री म्हणजे वेदाने आणलेला एक टिफीन 4 जणांत वाटुन खाणे, एक कॉफी 4 जणांत शेयर……. बस अशीच होती आमची लाईफ. आता कॉलेज संपुन प्रत्येक जण जॉबला लागला होता आणी कोइंसीडेंडटली आम्हाला जँबही एकाच एरीया मद्ये होती त्यामुळे रोज् सकाळी एकत्र जाणे व घरी येताना एकत्रच येणे आणी रवीवार म्हणजे फ़ुल्ली धमाल वन डे पिकनीक आणी बरेच काही
मी शेवटी ठरवले की वेदाला घरातुन मागणी घालायची लग्नासाठी, इतका विश्वास होता की ती नाही बोलणार नाही तसे नाही बोलण्यासारखे माझ्यात होते तरी काय? शेवटी एक दिवस मी धीर करुन माझ्या आईला हे सगळे सांगीतले. तशी ती माझी खुप जुनी फ्रेंड असल्यामुळे तिचे आमच्या घरी कायम येणे जाणे तर असायचेच. आईला पण तशी ती आवडायचीच त्यामुळे तिने लगेच होकार दिला. आई म्हणाली की तु इतक्यात तिला काहीही बोलु नकोस ह्याच रवीवारी आपण तिच्या घरी जाऊन बोलणी करु आणी तिलाही सरप्राईज देऊया. ठरवल्याप्रमाणे आम्ही सगळे रवीवारी तिच्या घरी गेलो.सगळी बोलणी झाली तिचे आईवडीलही मला ओळखतच होते त्यांनी त्यांच्या बाजुने होकार दिला बस एकदा वेदाच्या कानावर घालुन तिचा निर्णय विचारुन घेऊयात असे ठरले. मला काहीच प्रॉब्लेम नव्हता.. तितक्यात घरी वेदा आली आम्ही सगळे तिला न सांगता तिच्या घरी का आलोय हे मात्र तिला कळत नव्हते.तितक्यात तिची आईच बोलली की श्री ने तुला लग्नासाठी मागणी घातलीय आमच्या बाजुने तर काही प्रॉब्लेम नाहीय बस तु तुझा निर्णय सांग म्हणजे बाकीच्या गोष्ठी सुरु करता येतील. तेवढ्यात मीच तिला बोललो की वेदा आजचा दिवस निट विचार करुन घे मी तुला उद्या कॉल करेन .... असे बोलुन आम्ही तिथुन निघालो.
दुस-या दिवशी वेदाने समोरुन मला कॉल केला आणी बोलली की आजवर माझ्या आईवडीलांच्या शब्दाबाहेर मी कधीच गेली नाही आणी आताही जाणार नाही त्यांनी जो काही निर्णय घेतलाय तो मला मान्य आहे. आता आमच्या लग्नाची बाकीची बोलणी झाली .तारीखही फिक्स झाली बाकी मी आता खुप खुश होतो बस... एकच गोष्ठ मनाला टोचत होती... की हे सगळे झाल्यापासुन का माहीत नाही अथर्व मात्र खुप बदलल्यासारखा वाटत होता.. त्याला फोन करावा तर एक दोन मिनीट बोलुन तो फोन ठेवायची खुप वेगळा वागत होता... त्याने अचानक जॉबही चेंज केला . इतक्यात तो आम्हाला भेटलाही नव्हता आणी कारण विचारावे तर नवा जॉब असल्याने कामाचा लोड जास्त असल्याचे त्याने सांगीतले मी त्यावर काहीच बोलु शकलो नाही. वेदा मात्र आताही नेहमीसारखीच शांत होती. तिच्या मनाचा मागमुसही ती कधीच कोणालाही लागु द्यायची नाही.तिच्या मनात विचारांचे वादळ उठले होते तरीही ती वरुन शांतच वाटत होती..काही दिवस असेच गेले..
मी आता अथर्वच्या घरी जाऊन त्याला भेटुया असे ठरवले प्रिया लगेच तयार झाली वेदा मात्र माझी तब्येत ठिक नाही तुम्ही जाऊन या मी नंतर भेटेन असे वारंवार सांगत होती. शेवटी माझ्या आणी प्रियाच्या हट्टापुढे तिला नमते घ्यावे लागले ति तयार झाली . आम्ही त्याच्या घरी गेलो आम्हांला तिथे बघुन तो चमकलाच... तो खुप डिस्ट्रब वाटत होता काहीतरी गोष्ठ अशी होती ज्यामुळे तो हरला होता.वेदा मात्र मला काही ठिक वाटत नव्हती तिची ती अवस्था पाहुन मी तिला घेउन तिथुन निघालो प्रिया मात्र तिथेच थांबली. दुस-या दिवशी मी जेंव्हा प्रियाला कॉल केला तेंव्हा ती जे काही मला बोलली ते ऐकुन मी खुप खुश झालो काल प्रियाने त्याला प्रपोज केलं आणी त्यानेही तिला होकार दिलाय...
मी हे जेंव्हा वेदाच्या घरी तिच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी गेलो आणी जेंव्हा तीला ही गोष्ठ सांगीतली तेंव्हा त्यावर ती काहीच बोलली नाही. आमचे लग्न झाले आमचे अख्खे कॉलेज आले होते बस एक व्यक्ती नव्हता अथर्व. मला त्याचा खुप राग आला होता त्या रागाच्या भरात मी त्याला फोन करुन वाटेल ते आणी वाटेल तसे बडबडलो.. पण तो काहीच बोलला नाही. नुसता ऐकत होता..थोड्या वेळाने वेदा तिथे आली आणी मला म्हणाली की बरेच दिवस तुला एक गोष्ठ सांगायची होती पण काही केल्या हिम्मत येत नव्हती. तु मला लग्नाची मागणी घातलीस पण आपण कॉलेजमध्ये असतानाच मी आणी अथर्वने एकमेकांना त्यांच्या ख-या फिलींग्स सांगीतल्या होत्या..वि आर कमीटेड फ्रॉम दँट टाईम.. तेंव्हा एकमेकांच्या प्रेमात आम्ही कधी पडलो ते आम्हालाच कळले नाही आणी ज्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आलात त्याच दिवशी मी माझ्या घरी सांगणार होते..पण कदाचीत खुप उशीर झाला.माझ्या आईवडीलांच्या शब्दाबाहेर मी कधीच गेली नव्हती आणी त्यादिवशीही केवळ त्यांनी तुम्हाला दिलेल्या शब्दाचा मान राखत मी तुला होकार दिला....
तुला आठवतेय का त्यादिवशी आपण दोघे निघालो तरी प्रिया तिथे बसुन होती त्या रात्री प्रियाने मला कॉल केला आणी मला ती बोलली की तिला अथर्व कॉलेज मध्ये असल्या पासुन आवडत होता..आणी आज त्याची ति अवस्था बघुन आज तिला त्रास होत आहे. तेंव्हा तिला मी म्हणाले की त्याच्या ह्या अवस्थेला केवळ एकच व्यक्ती जबाबदार आहे आणी ती म्हणजे मी स्वतःहा आणी मग तिला मी सगळे काही सांगीतले.बस तिला इतकेच बोलले की अथर्वची काळजी घे तो खुप एकटा पडला आहे आता त्याची काळजी नाही घेऊ शकणार मी पण प्लिज तु त्याला जप....ह्या जगात माझ्याशिवाय अथर्वला कोणी समजुन घेऊ शकणार असेल तर ती तुच आहेस प्रिया... माझ्या बोलण्यानुसार तीने त्याला प्रपोज केले आणी लवलरचे तेही लग्न करतील. हे सगळे ऐकुन माझ्या लक्षात आले की म्हणुनच त्यादिवशी मी जेंव्हा वेदाला ही गोष्ठ सांगायला आलो तेंव्हा तीने काहीच प्रतिक्रिया का दिली नाही.
हे सगळे ऐकुन मला मात्र खुप वाईट वाटले कारण अजाणतेपणी का होईना ह्या दोन प्रेम करणा-या जिवांच्या मध्ये येऊन त्यांचे स्वप्न मात्र मी कायमचे उध्वस्थ केले होते...
best story.
ReplyDeleteछान जमली आहे कथा
ReplyDeleteAho....
ReplyDeleteAamhi pudhachya kathaanchi vaat paahun-paahun damlo..ho...
Pudhache kadhi???
(Amol Chitte)