Thursday, July 14, 2011

सप्रेम भेट...

त्या हरामखोर पाकी अतिरेकी अजमल आमीर कसाबच्या वाढदिवसाची..त्याच्याच भावबंधुंकडुन तमाम मुंबईकरांना सप्रेम भेट... धर्मनिरपेक्षवादाचा बुरखा लावुन तिथे केंद्रात नी इथे राज्यात बसलेल्या सरकारमधील षंढांनो निदान आता तरी उठा..तो कुंभकर्णही नक्कीच उठला असता त्याच्या झोपेतुन कालच्या झवेरी बाजारात झालेल्या स्फोटाच्या आवाजाने. पण तुम्ही नाही उठणार...कारण तुमअन भर म्हणुन तो लुंगी मास्टर म्हणे की मुंबईत बारा आतंकवादी घुसलेत...त्यांनी दोन\दोन चे ग्रुप बनवुन सदर स्फोट केला? अरे नालायकांनो एवढी माहीती होती. मग वाट कसली बघत होतात? त्यांनी येण्याचे आमंत्रण देण्याची? निलाजरेपणाची किव येते ह्या माणसाच्या...्ही झोपेचे सोंग घेऊन बसलायत..आणी त्यामुळे बाहेर काहीही झाले तरी तुमचे कर्तव्य फक्त न्युज चँनेल्सना बाईट द्यायचे...की सर्व नागरिकांना विनंती आहे..की गरज नसल्यास बाहेर पडु नये..अरे साल्यांनो...मग आमचे पोट कोण भरणार?

तुमचे बरे आहे...काम करा अथवा नको..तुम्हास तुमचा पगार(भत्ता) पोहोचतोच...पण आमचे पोट आमच्या हातांवर आहे...वर चौकशीचे आदेश देण्याचे महत्कार्य तुम्ही नक्कीच केले आहे...चौकशी समीती येईल..दोषींना पकडलेही जाईल पण पुढे काय?...पुन्हा अजुन एक अजमल कसाब...किंवा तो अफजल गुरु...अन त्याच्या बाजुने कोर्टात लढणारे आमचेच "सो कॉल्ड भारतीय"
अरे त्यांना पोसण्यापेक्षा द्या ताब्यात आम्हा मुंबईकरांच्या...

आम्ही कर भरायचे..सरकारी तिजो-या भरायचे..अन तुम्ही मात्र त्या #$#$#@@%@% आमच्या घामाच्या पैश्याने बिर्याणी खायला द्यायचे...अंडासेल मध्ये ठेवायचे...एकदा ताब्यात द्या इथला प्रत्येक मुंबईकर त्या साल्याला अंड्यासारखा सोलुन काढेल....
आणी हो आता तुम्हाला नक्क्कीच पुळका येईल....प्रत्येकाचा मदतीचा हात किती लांब आहे हे दाखवण्याची पुन्हा नव्याने स्पर्धा सुरु होईल...पण एक कळकळीची विनंती आहे...की प्लिज विनंती आहे की त्या हॉस्पिटल्समध्ये
जाऊन तिथे नौंटंकी करुन लाईमलाईट मध्ये येऊ नका..तुमचा खरा चेहरा आम्ही पाहीलाच आहे...सो तिथे..जे जखमी आहेत त्यांना निदान पुर्ण त-हेने वैद्यकीय मदत मिळुद्या....


अन हे मान्य नसेल तर मुंबईकरांच्या रोषास सामोरे जाण्याची मानसिक तयारी करुनच या...त्याची झलक कालच तुम्च्या आर. आर. आबांना दिसलीच आहे, त्यांनाही एकच सांगायचे आहे..की बडे बडे शेहरोंमेंवाल्या डायलॉगची किंमत अजुन चुकती करायची आहेच त्यांना...

"भारतीय प्रजासत्ताकाचा" नागरीक म्हणुन जगण्याची आम्हांस ही किंमत अजुन किती वर्ष सोसावी लागेल? सर्वत्र रोष उसळला आहे अन त्यात भर घालत आहेत..ते आम्हींच निवडुन दिलेले भिकार नेते...
राहुल गांधीः- आपण दहशतवादी हल्ले नाही रोखु शकत...(भारताचा भावी पंतप्रधान असे सरकार दरबारी ज्याला संबोधले जाते) असे बोलतो तेंव्हा त्यावर काय म्हणावे? अमेरिकेचा संदर्भ जरुर द्या पण हे लक्षात असुदे की 9/11 नंतर तिथे एकही हल्ला झाला नाही....
पाकीस्तान पेक्षा भारताची स्थिती चांगली आहे तिथे दर आठवड्याला स्फोट होतात...आपल्याकडे कधी तरी होतात....आणी सर्वात राग आला तो ज्याला जगातल्या प्रत्येक गोष्ठीवर मत नोंदवण्याची जुनी खोड आहे...तो साठीत अक्कल नाठलेला म्हातारा दिग्वीजय सिंघ....अथः दिग्वीजय सिंग उवाचः सा-यातुन फक्त एकच कळतेय...आणी बहुदा तेच तुमच्यासाठी आहे रे लांडग्याची औलाद असलेल्या नेत्यांनो..की तुम्ही तुमच्या लाल दिव्याच्या गाडीतुन बाहेर पडुन जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करु नका...नाहीतर आधीच डिवचलेली जनता...तुम्च्या वळवळत्या मुंडक्यावर पाय देऊन ठेचुन टाकेल तुम्हाला....त्याचे प्रत्यंतर प्रुथ्वीबाबा अन आर. आर. आबा तुम्हाला आलेच आहे.... अरे ह्या म्हाता-याला गप्प कसं बसवायचं कोणी सांगेल का?अरे ####### म्हणजे आम्ही रोज मरावं अशी इच्छा आहे का रे तुझी #$@@%%@%@ ...बर एकापेक्षा एक...

           मुंबई पुन्हा लढेल... राखेतुन उभी राहील... पुन्हा झगमगुन निघतील इथले रस्ते ...पण तिच्या रस्त्यांवर सांडलेल्या त्या निष्पाप नागरिकांचे रक्त धुण्याचा प्रयत्न बहुतेक पावसालाही जमत नाहीय...तिन दिवस नुसता खुळ्यासारखा बरसतोय तोही..पण अशक्य...अनेकांचे भरले संसार उध्वस्थ झालेत...कित्तेकांचे वंशाचे दिवे...मालवुन गेलेत...त्यांची भरपाई????अशक्य....जे गेले ते सुटुनही गेले...पण जे मागे राहीलेत...त्यांच्या समोर एकच प्रश्न....क्या पता मेरा नंबर कब आएगा?

मुंबईकर...(ओंकार)

No comments:

Post a Comment